संजू सॅमसन अडकणार लग्नाच्या बेडीत

वृत्तसंस्था
Sunday, 9 September 2018

मुंबई : क्रिकेटपटू संजू सॅमसन याने डिसेंबर महिन्यात आपल्या कॉलेजमधील मैत्रिणीसह लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे आज (रविवार) फेसबूकवरुन जाहीर केले. 

संजूने फेसबूकवर त्याचा आणि त्याची होणारी बायको चारु हीचा फोटो शेअर करत ही बातमी सांगितली. चारुचे वडिल बी रमेश कुमार यांनी लग्न 22 डिसेंबरला पार पडणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, ''हे दोघेही कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. दोघांच्याही पालकांच्या आशिर्वादाने हे लग्न ठरविण्यात आले आहे.''

चारु सध्या पदव्युत्तरचे शिक्षण घेत आहे. सॅमसनने 2013मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. गत मोसमात त्याने राजस्थान रॉयलकडून खेळताना 15 सामन्यांमध्ये 441 धावा केल्या होत्या. त्याने भारताकडून फक्त एक ट्वेंटी20 सामना खेळला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने आजवर 130 ट्वेंटी सामने खेळले असून त्यात त्याने एक शतक आणि 20 अर्धशतके केली आहेत. 

​ ​

संबंधित बातम्या