वातावरण तापलंय, तरी तू संयम सोडू नकोस

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 July 2019

अनेक कारणांवरून लांबत झालेली भारतीय क्रिकेट संघाची निवड आणि त्याबरोबरीने होणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची चर्चा आता चांगलीच रंगू लागली आहे. "बीसीसीआय'चे माजी सचिव संजय जगदाळे यांनी "निवृत्तीचा निर्णय घेण्या इतका धोनी नक्कीच परिपक्व आहे.' असे मत व्यक्त केले आहे. 

इंदौर : अनेक कारणांवरून लांबत झालेली भारतीय क्रिकेट संघाची निवड आणि त्याबरोबरीने होणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची चर्चा आता चांगलीच रंगू लागली आहे. "बीसीसीआय'चे माजी सचिव संजय जगदाळे यांनी "निवृत्तीचा निर्णय घेण्या इतका धोनी नक्कीच परिपक्व आहे.' असे मत व्यक्त केले आहे. 

धोनीच्या निवृत्तीची निवड समितीलाच अधिक घाई लागल्याचे दिसून येत आहे. संजय जगदाळे म्हणाले,""धोनीच्या भवितव्याविषयी निर्णय घेण्यापूर्वी निवड समितीने आपल्याकडे उपलब्ध असल्याचे सर्व पर्याय तपासून पहावेत. तयाचबरोबर त्याच्या मनात काय चालले आहे हे जाणून घ्यावे.'' 

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शनिवारी होणारी बैठक पुन्हा एकदा रविवारपर्यंत (ता. 21) पुढे ढकलण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर संजय जगदाळे यांनी पुन्हा एकदा पर्यायाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ते म्हणाले,""धोनीच्या यशस्वी कारकिर्दीविषयी थेट निर्णय घेण्याचा अधिकार त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणालाच नाही. निवड समितीने वेस्ट इंडिजसाठी संघ निवडताना यष्टिरक्षक फलंदाज या जागेसाठी उपलब्ध पर्यायांचा विचार करावा. सध्या तरी धोनीला पर्याय नाही असेच चित्र आहे.'' 

व्यवहारिक निर्णय घ्यावा 
एकीकडे धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयावरून अनेकविध मतप्रवाह पुढे येत असताना माजी सलामीचा फलंदाज गौतम गंभीर याने धोनीच्या कारकिर्दीबाबत भावनिक नव्हे, तर व्यावसायिक दृष्टिकोनातून निर्णय घेण्याची गरज आहे. त्याची जागा घेण्यासाठी अनेक युवा खेळाडू संधीचा वाट बघत आहेत. त्यांचा विचार करण्याची वेळ आली आहे.'' 

युवा खेळाडूंना योग्य वेळी संधी दिली तरच ते आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थिरावू शकतील असे मत मांडताना गंभीरने जुना वाद उकरून काढला. तो म्हणाला,""युवा खेळाडूंना योग्य वेळी संदी मिळाली, तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थिरावू शकतील. हेच धोरण धोनीने आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत अवलंबले होते आणि सचिन, सेहवाग एकत्र खेळू शकणार नाहीत असे विधान केले होते. युवा खेळाडूंचा तोच विचार डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेण्यात यावा.'' 

धोनीच्या यशाचे श्रेय त्याच्या एकट्याचे नाही. प्रत्येक खेळाडूचा त्यात वाटा आहे. आकड्यांचा विचार केला तर धोनी यशस्वी कर्णधार आहे. याचा अर्थ असा नाही की बाकी कर्णधार अपयशी होते. 
गौतम गंभीर, माजी क्रिकेटपटू 

तुझ्या निवृत्तीच्या चर्चेचे वातावरण तापले असले, तरी तु तुझा संयमी स्वभाव सोडू नकोस, निर्णय घेण्यापूर्वी शंभरवेळा विचार कर. संघाला तुझी गरज आहे. 
कपिलदेव, भारताचे माजी कर्णधार


​ ​

संबंधित बातम्या