बांगरने चार वर्षांत असे काय काम केले की त्यांना हाकलू नये?

वृत्तसंस्था
Saturday, 27 July 2019

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकांचा कार्यकाळ संपल्याने आता नवीन प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. मात्र, यातही गोलंदाजीचे प्रशिक्षक भारत अरुण आणि क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक श्रीधर यांचे प्रशिक्षकपद कायम राहण्याची चिन्हे आहेत. मात्र, फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकांचा कार्यकाळ संपल्याने आता नवीन प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. मात्र, यातही गोलंदाजीचे प्रशिक्षक भारत अरुण आणि क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक श्रीधर यांचे प्रशिक्षकपद कायम राहण्याची चिन्हे आहेत. मात्र, फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. 

बांगर यांना चार वर्षे पदावर राहूनही मधली फळी उभारण्याच अपयश आले आहे. गेली अनेक वर्ष मधली फळी ही भारताची डोकेदुखी राहिलेली आहे. याच मधल्या फळीचे अपयश विश्वकरंडकात सर्वांसमोर आले. त्यामुळे बांगर यांची हकालपट्टी होण्याची दाट शक्यता आहे. 

''गेल्या 20 महिन्यात अरुण यांनी चांगले काम केले आहे. सध्याची भारताची गोलंदाजी कसोटीसाठी सर्वोत्कृष्ट आहे. महंमद शमी आणि जसप्रित बुमरा सध्या तुफान फॉर्मात आहेत आणि याचे सर्व श्रेय अरुण यांना जाते. निवडकर्ते त्यांच्याऐवजी अन्य कुणाला प्राधान्य देण्याची शक्यता नाही,'' अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

 


​ ​

संबंधित बातम्या