सानिया मिर्झा ‘फेड कप हार्ट’ पुरस्काराने सन्मानीत, बक्षीसाची रक्कम केली दान  

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 May 2020

सानियाने पुरस्कारात मिळालेली रक्कम तेलंगाना मुख्यमंत्री निधीत दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताची आघडीची टेनिसपटू सानिया मिर्झाला पृतिष्ठीत फेड कप हार्ट पुरस्काराने गौवरवण्यात आले आहे. सानियाला आई झाल्यानंतर यशस्वी पणे टेनिस कोर्टवर परतण्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला असून सानियाने पुरस्कारात मिळालेली रक्कम तेलंगाना मुख्यमंत्री निधीत दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विट करत सानियाने यासंबंधीची माहिती दिली आहे


सानियाला अशिया विभागासाठी हा पुरस्कार देण्यात आला, हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली भरतीय ठरली आहे तीमे 16 हजार 985 मतांपैकी 10 हजार पेक्षा जास्त मते मिळवत हा पुरस्कार पटकावला आहे. फेड कप हार्ट या पुरस्कार विजेत्यांची निवड ही मतांच्या आधारे केली जाते, मे महिन्यात सुरु झालेल्या या प्रक्रीयेत एकूण मतांपैकी 60 टक्के मते सानियाला पडली आहेत.

 

 

सानियाने चार वर्षात फेड कप स्पर्धेत मिळालेल्या 2 हजार अमेरिकन डॉलर्स हि रक्कम तेलंगाना मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दान केली आहे. 2018 साली मुलहा इजहान याला जन्म दिल्यानंतर या वर्षीं जानेवारी मध्ये परत टेनिस खेळणे सुरु केले होते आणि नादिया किचेनोक सोबत मिळून होबार्ट इंटरनॅशनल ही स्पर्धा जींकली होती.  
 


​ ​

संबंधित बातम्या