Asia Cup 2018 : विराटचा निर्णय चुकीचा : संदीप पाटील 

वृत्तसंस्था
Saturday, 15 September 2018

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटसंघाच्या निवड समितीचे माजी सदस्य संदीप पाटील यांनी आशिया करंडकात भारताचा कर्णधार विराट कोहलीचा विश्रांती घेण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले आहे.

ते म्हणाले, ''ट्वेंटी20 क्रिकेटला सुरवात झाल्यापासून भारताचे अनेक खेळाडू पैशांची खाण असलेल्या आयपीएलमध्ये खेळण्यासाठी भारतीय संघात खेळण्याचे टाळतात. आशिया करंडकात निवड समितीने भारताचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय धक्कादायक आहे.''

निवड समितीचे अध्यक्ष एम एस के प्रसाद यांनी विराट कोहलीला विश्रांती देण्याचे कारण यापूर्वीच स्पष्ट केले आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यामुळे विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. आशिया करंडकानंतर होणाऱ्या परदेश दौऱ्यांसाठी भारतीय संघातील सर्वोत्तम खेळाडू तंदुरुस्त असणे गरजेचे असल्याने त्याला विश्रांती देण्यात आली आहे. 

''सततच्या क्रिकेटमुळे खेळाडूंवर येणारे दडपण मी समजू शकतो मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची गोष्ट असते तेव्हा दोन्ही देशांमधील क्रिकेटवेड्या चाहत्यांना त्यांच्या सर्वोत्तम खेळाडूंना पाहायचे असते, अशात विराट कोहलीने विश्रांती घेणे योग्य नाही,'' असेही त्यांनी सांगितले. 

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचे उदाहरण देत ते म्हणाले, ''अत्यंत कमी वयात त्यांच्यावर खेळाचा ताण होता तरीही त्यांना निवृत्तीपर्यंत एकही सामनाला मुकावे लागले नाही. आजकालचे खेळाडू एवढे तंदुरुस्त असूनही त्यांना सामन्यांचा ताण सहन करता न यावा याचे मला नवल वाटते,'' असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.  

आशिया करंडकात भारताचा पहिला सामना 18 सप्टेंबरला हाँग काँगविरुद्ध होणार आहे. 
 
संबंधित बातम्या