पॉलाक म्हणाले, या कृतीत आरोग्यासंदर्भात 'रिस्क' नव्हती

टीम ई-सकाळ
Tuesday, 9 June 2020

याआधी क्रिकेट सामन्यात सर्वांच्याच सुरक्षितेसाठी आयसीसीच्या वैद्यकीय सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. पीटर हार्कोर्ट यांनी दिलेल्या अहवालानुसार, चेंडूला लावण्यात येणाऱ्या थुंकीमुळे करोना विषाणू संसर्गाच्या वाढीबाबत जोखीम असल्याचे म्हटले होते.

क्रिकेट सामन्यात गोलंदाज चेंडू स्विंग करण्यासाठी तसेच चमक आणण्यासाठी आपल्या थुंकीचा वापर करत असतात. परंतु सध्या जगभरात कोरोनाच्या  विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे याचा फटका क्रिडा क्षेत्राला देखील बसला आहे. कोरानाजन्य परिस्थितीतून सावरत खेळ पुन्हा सुरु झाल्यानंतर गोलंदाजासमोर मोठे आव्हान असणार आहे. चेंडू स्विंग करण्यासाठी थूंकीवरील निर्बंधामुळे त्यांचा मैदानात अधिक कस लागेल. यासंदर्भात अनेक प्रतिक्रिया उमटत असताना आता दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज शॉन पोलॉक याने सामना सुरक्षित ठिकाणी खेळवल्यास खेळाडूंनी चेंडूला लाळ लावल्याने कोणताही धोका नसल्याचे म्हटले आहे. 

#वर्णभेदाचा_खेळ : तिच्या उदरातील बाळावरही झाली होती विकृत टिपण्णी

क्रिकेट सामन्यात चेंडूची चमक टिकून राहण्यासाठी नेहमी खेळाडू थुंकीचा अथवा घामाचा वापर करतात. परंतु यामुळे करोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. कोरोनाच्या साथीमुळे विस्कळीत झालेले क्रिकेटचे वेळापत्रक हळूहळू पुन्हा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. तब्बल दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना सुरवात होत आहे. अशावेळी कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) चेंडूची चमक कायम ठेवण्यासाठी थुंकीचा वापर न करता घामाचा वापर केल्यास कोणताच धोका नसल्याचे म्हटले होते. 

'चेंडू चमकवण्यासाठी कृत्रिम पदार्थ वापरण्याऐवजी हा प्रयोग करता येईल'

सामन्यात चेंडूची चमक टिकून रहावी म्हणून तसेच, गोलंदाज चेंडूला वळविण्यासाठी आपल्या थुंकीचा वापर करतात. पण कोरोनामुळे आयसीसीने नेमलेल्या अनिल कुंबळे याच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट समितीने यावर खबरदारी म्हणून बंदी घालण्याची शिफारस केली होती. त्यानंतर यावर आयसीसीने शिक्कामोर्तब केले होते. आयसीसीच्या या निर्णयावर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज शॉन पोलॉक याने प्रतिक्रिया दिली आहे. या बंदीची आवश्यकता नव्हती असे तो म्हणाला. नुकताच वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंड दौऱ्यावर येत आहे आणि ज्याप्रकारे कोरोनाच्या खबरदारीसाठी मैदानावर जैविक सुरक्षित वातावरण तयार करण्यात येत आहे. त्यावरून अशा वातावरणात कोणत्याही प्रकारची बंदी घालण्याची गरज नसल्याचे मत शॉन पोलॉकने व्यक्त केले आहे. या सामन्यांच्या वेळेस मैदानावरील वातावरण हे एका फुग्याप्रमाणे असेल आणि त्यामुळे जे खेळाडू मैदानावर उतरणार आहेत ते पूर्वीच आरोग्यविषयक सर्व चाचणी मधून गेले असल्याने कोरोनाचा संसर्ग त्यांच्या पर्यंत पोहचणार नाही. त्यामुळे चेंडूला चमकविण्यासाठी लाळेचा वापर केला तरी कोणताही फरक पडणार नसल्याचे शॉन पोलॉकने म्हटले आहे.  

'...तर BCCI ला IPL स्पर्धा घेण्याचा अधिकार'

याआधी क्रिकेट सामन्यात सर्वांच्याच सुरक्षितेसाठी आयसीसीच्या वैद्यकीय सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. पीटर हार्कोर्ट यांनी दिलेल्या अहवालानुसार, चेंडूला लावण्यात येणाऱ्या थुंकीमुळे करोना विषाणू संसर्गाच्या वाढीबाबत जोखीम असल्याचे म्हटले होते. त्यावर उपाय म्हणून तात्पुरते बदल करण्यासंदर्भात अनिल कुंबळे याच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट समितीने एकमताने काही बदल प्रस्तावित केले होते. सध्याच्या परिस्थितीत सुरक्षितपणे क्रिकेट सामने सुरु करण्याच्या उद्देशाने, समितीने वैद्यकीय सल्ल्याचीही नोंद घेत घामातून विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता फारच कमी असून, खेळण्याच्या मैदानावर आणि आजूबाजूला वर्धित ठिकाणी स्वच्छताविषयक उपायांची कठोर अंमलबजावणी केल्यास सामन्यांसाठी उपयुक्त होण्याची शक्यता वर्तविली होती. तसेच सामन्यात पंच म्हणून यजमान देशाच्याच पंचाची नियुक्ती करण्यात यावी आणि तंत्रज्ञानाचा वापर अधिक करत  प्रत्येक डावात प्रत्येक संघासाठी डीआरएस पुनरावलोकनचा निर्णय वाढवून देण्याचा प्रस्ताव दिला होता. यापूर्वी सामन्यांसाठी दोन्ही संघातील किंवा तटस्थ पंच यांची नेमणूक करण्यात येत होती. तर, प्रत्येक सामन्यात दोन डीआरएस पुनरावलोकनाची संधी संघाना आयसीसीच्या नियमानुसार देण्यात येत होती. पण आता उपाय म्हणून हा तात्पुरता बदल समितीने प्रस्तावित केलेला आहे.


​ ​

संबंधित बातम्या