साक्षी-धोनीनं शेअर केला झिवाचा फोटो; नेटकरी विचारतायेत बाळ कोणाचे?
काही नेटकरी तर थेट साक्षी अन् माहीला शुभेच्छा देत आहेत.
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज असलेल्या धोनी सध्या चर्चेत आहे. त्याच्या पाठोपाठ आता साक्षी धोनीनेही नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या साक्षीने लेक झिवाचा एक फोटो इन्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलाय. या फोटोमध्ये झिवा एका छोट्या बाळाला कवेत घेऊन बसल्याचे दिसते. हा फोटो पाहून धोनीच्या चाहत्यांना मोठा प्रश्न पडला आहे.
धोनीचा वारसदार म्हणून पंतकडे पाहिले जाते; पण...
झिवा कोणाच्या बाळासोबत आहे असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. काही नेटकऱ्यांनी धोनीची दुसरी मुलगी का? असा प्रश्नही उपस्थितीत केलाय. काहींनी हे बाळ हार्दिक पांड्याचे असावे, असा अंदाजही व्यक्त केलाय. हार्दिक-नताशा या जोडीच्या घरी नुकतेच नव्या पाहुण्याचे आगमन झाले होते. त्यामुळे काही चाहते झिवा हार्दिकच्या मुलासोबत असावी असा अंदाज लावत आहेत.
कॅरेबियन लीगच्या मागील हंगामातील किंगची फटकेबाजी (व्हिडिओ)
काही नेटकरी तर थेट साक्षी अन् माहीला शुभेच्छा देत आहेत. एका नेटकऱ्यांने तुम्हाला दुसरे अपत्य झाले का? असा प्रश्न उपस्थितीत केलाय. आणखी एकाने दोघांना शुभेच्छाही दिल्याचे दिसत. काहीजण हे बाळ हार्दिक पांड्याचे आहे का? असा प्रश्नही उपस्थितीत केलाय. साक्षी नेहमीच माही-झिवासोबतचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. फोटो किंवा व्हिडिओ शेअर करताना ती कॅप्शनही देत असते. पण यावेळी तिने झिवाचा फोटो शेअर करताना कॅप्शन न देता केवळ हर्ट इमोजीचा वापर केला आहे. त्यामुळे माही-साक्षीच्या चाहत्यांसमोर मोठा प्रश्न उपस्थितीत झाला आहे.