MSD नं डोळ्यातील आसवांनाही सावरल असेल; साक्षीची भावनिक पोस्ट

सुशांत जाधव
Sunday, 16 August 2020

इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेत धोनी अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीवर त्याची पत्नी साक्षी धोनी हिने भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. धोनीने इन्स्टाग्रामवरुन निवृत्तीच्या चर्चेला पूर्णविराम दिल्यानंतर साक्षीने एक पोस्ट लिहिली आहे. धोनीने आपल्या प्रवासात जो टप्पा गाठला तो अभिमानास्पद आहे. खेळाच्या मैदानातील प्रामाणिक योगदानाबाबत साक्षीने धोनीचे आभारही मानले आहेत.  

धोनी क्रिजमध्ये पोहचला नाही तो नाहीच!

इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेत धोनी अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. या स्पर्धेतील प्रबळ दावेदार असलेल्या विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने पराभवाचा धक्का दिल्याचे आपण पाहिले. फिनिशिंग स्टाइलने संघाला विजय मिळवून देणारा जादूगार धोनी मैदानात असेपर्यंत भारतीयांना विश्वचषकाची आस होती. पण तो धावबाद झाला तेव्हा भारताच्या विश्वविजेता होण्याचे स्वप्न अधूरे राहिले. ती अधूरी धावच धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अखेरची धाव ठरली. साक्षीने आपल्या पोस्टमध्ये धोनीच्या कामगिरीचा अभिमान वाटतो असा उल्लेख केलाय. हा निर्णय घेणे धोनीसाठी सहज आणि सोपे नव्हते. आसवांना आवरत अलविदा करण्याचा निर्णय घेतला असेल, यात काही शंका वाटत नाही, असेही साक्षीने म्हटले आहे. 

VIDEO - धोनीचे चाहते हा क्षण कधीच विसरणार नाहीत

#thankyoumsd #proud' या हॅशटॅगसह केलेल्या पोस्टमध्ये साक्षीने धोनीसाठी अमेकन प्रसिद्ध कवी माया अँजेलो यांच्या चार ओळीही शेअर केल्यात. 'तुम्ही काय बोलला लोक विसरतील, तुम्ही काय केलं  हे देखील त्यांच्या लक्षात राहणार नाही पण तुम्ही दिलेला आनंदी क्षण ते कधीच विसरणार नाहीत. धोनी क्रिकेटच्या मैदानातील यशस्वी कर्णधारांच्या यादीतील एक क्रिकेटर आहे. त्याने भारतीय संघाकडून  350 एकदिवसीय सामने 90 कसोटी आणि 98 टी20 सामने खेळले आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या