रणधुमाळीचे नव्हे; पुणेकरांना  वेध लागले 'रन'धुमाळीचे! 

मुकुंद पोतदार
Monday, 25 March 2019

ही लीग आहे सकाळ सोसायटी क्रिकेट लीग! 
यंदा पहिलेच वर्ष असलेल्या या लीगला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. मर्यादित संघांना प्रवेश असल्यामुळे संघप्रवेशाची औपचारिक प्रक्रिया पूर्ण करून अनेक संघांची नेट प्रॅक्‍टीसही सुरू झाली आहे.

सध्या आचारसंहिता लागू होऊन निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली तरी पुण्यातील सोसायट्यांची "रन'धुमाळी सुरू आहे. मुख्य म्हणजे ही रनधुमाळी आयपीएलच्याच सुमारास सुरू असली तरी ती वेगळ्याच लीगशी संबंधित आहे. ही लीग आहे सकाळ सोसायटी क्रिकेट लीग! 
यंदा पहिलेच वर्ष असलेल्या या लीगला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. मर्यादित संघांना प्रवेश असल्यामुळे संघप्रवेशाची औपचारिक प्रक्रिया पूर्ण करून अनेक संघांची नेट प्रॅक्‍टीसही सुरू झाली आहे. स्पर्धेचा कालावधी आणि सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. त्यासाठी सोसायट्यांचे थिंक टॅंक आतापासूनच सज्ज झाले आहेत. 

संघाच्या स्वरूपाचे स्वागत 
सहकारी सोसायटीतील प्रत्येक वयोगटातील खेळाडूंना संधी मिळेल, असे संघाचे स्वरूप "सकाळ'ने ठेवले आहे. त्यात 12 ते 45 वर्षांपेक्षा जास्त यांतील चार वयोगटांचा समावेश आहे. प्रत्येक गटाला एक राखीव खेळाडू आहे. त्यामुळे सोसायटीच्या संघात स्थान मिळविण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. 

पुणेकरांनो, सकाळ सोसायटी क्रिकेट लीग स्पर्धेचे नियम व अटी जाणून घ्या 

पुणेकरांनो, आपल्या सोसायटीने फॉर्म भरून तुमचा उत्साह दाखविला आहे. तेव्हा नावनोंदणी केलेल्या सोसायटीधारकांनो त्वरा करा 26 मार्चपर्यंत प्रवेश फी भरून आपला सहभाग निश्‍चित करा. तुमच्या टीममध्ये 8 खेळाडू अधिक 4 राखीव खेळाडू असावयास हवेत. रजिस्टर केलेल्या टीम आठ ग्रुपमध्ये विभागल्या जातील. प्रत्येक ग्रुपमधील विजेत्या टीम क्वार्टर फायनल व नंतर सेमी फायनलसाठी खेळतील. सगळ्या मॅचेस शनिवार व रविवार या दिवशी घेतल्या जातील. या स्पर्धेत टेनिस बॉलचे हाफ पीच सामने असणार असून रिव्हर्स ओव्हर आर्म बोलिंग असणार आहे आणि प्रत्येक इनिंग 6 ओव्हर्सची आहे. या स्पर्धेसाठी 11 यार्डचे मॅटेड पीच व सीमारेषा 40 यार्ड असेल. तुमच्या टीममध्ये वय वर्षे 12 ते 45+ वयाच्या खेळाडूंचा सहभाग बंधनकारक असणार आहे. 

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन फी असून, सहभागासाठी सोसायटीचे रजिस्ट्रेशन, पॅन कार्ड, डीड ऑफ डिक्‍लेरेशन इ. कागदपत्रे आवश्‍यक आहेत. सोसायटीने आपल्या खेळाडूंचे रजिस्ट्रेशन केलेले हवे व खेळाडूंच्या वयाचा दाखला, रहिवासी पुरावा इ. कागदपत्रे जोडलेली हवीत. 26 मार्चपर्यंत 2000 रु. प्रवेश फी भरून सोसायट्यांना आपला सहभाग नोंदवता येईल. पैसे रोख, RTGS/NEFT किंवा चेकने भरू शकता. रोख रक्कम पंडित फार्म्स, म्हात्रे पुलाजवळ सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत भरता येईल. अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा.


​ ​

संबंधित बातम्या