Schoolympics 2019 : ‘आनंद, शाहू प्रशाला, कोरे, वारणा’चे दणदणीत विजय

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 December 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. शिंगणापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशालेच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

कोल्हापूर - मुलांच्या खो-खो स्पर्धेतील साखळी सामन्यात व्ही. डी. शिंदे, आनंद सेमी, राजर्षी शाहू प्रशाला, विलासराव कोरे, आदर्श गुरुकुल, वारणा विद्यानिकेतनने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत विजयी सलामी दिली. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. शिंगणापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशालेच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

निकाल असा : व्ही. डी. शिंदे हायस्कूल वि. वि. मानव हायस्कूल (१२-१०), आनंद सेमी इंग्लिश स्कूल वि. वि. दत्ताबाळ इंग्लिश मीडियम स्कूल (८-२), आनंद सेमी इंग्लिश वि. वि. ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल (२-१), राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला वि. वि. विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल (१०-०), विलासराव कोरे हायस्कूल वि. वि. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल (८-१), आदर्श गुरुकुल विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज वि. वि. विलासराव कोरे हायस्कूल (८-६), वारणा विद्यानिकेतन वि. वि. विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल (९-१). अन्य सामन्यांत डी. सी. नरके विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयाला माऊली पब्लिक स्कूल, ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलला मेजर आनंदराव घाडगे इंग्लिश प्रायमरी स्कूल अँड हायस्कूल व नागोजीराव पाटणकर हायस्कूल, विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूलला दत्ताबाळ हायस्कूल, वारणा विद्यानिकेतनला दत्ताबाळ प्राथमिक विद्यामंदिर, तर जागृती हायस्कूलला आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूलविरुद्धच्या सामन्यात पुढे चाल मिळाली.


​ ​

संबंधित बातम्या