Schoolympics 2019 : भोसले, आंबेकरसह तोडकर उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 December 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा सासने मैदानावरील दिलीप देसाई बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू आहे.

कोल्हापूर - मुलींच्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत श्रावणी पाटील, रितिका भोसले, गार्गी आंबेकर, दाक्षायणी पाटील, १४ वर्षांखालील विभा पाटील, स्वरा लाड, श्रुती शंकरगौडा, राधिका काणे, तर १६ वर्षांखालील गटात खुशी पाटील, श्रावणी तोडकर, आर्या कुकडे व प्रेरणा कुलकर्णीने उपांत्य फेरीत आज प्रवेश केला. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा सासने मैदानावरील दिलीप देसाई बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू आहे.

निकाल असा : १२ वर्षांखालील-  श्रावणी पाटील (विबग्योर) वि. वि. अँजेल जैन (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई), रितिका भोसले (कोल्हापूर पब्लिक) वि. वि. शर्वरी भोसले (न्यू मॉडेल इंग्लिश), गार्गी आंबेकर (पोदार इंटरनॅशनल) वि. वि. अद्विता पाटील (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमीज), दाक्षायणी पाटील (छत्रपती शाहू, एसएससी) वि. वि. प्रियदर्शनी संघवी (विबग्योर).  १४ वर्षांखालील- विभा पाटील (बळवंतराव यादव) वि. वि. आसावरी चव्हाण (महावीर इंग्लिश), स्वरा लाड (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) वि. वि. जीवल फडणीस (माईसाहेब बावडेकर), श्रुती शंकरगौडा (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई) वि. वि. रोशनी पाटील (होलीक्रॉस कॉन्व्हेंट), राधिका काणे (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई) वि. वि. राशी नहार (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई). १६ वर्षांखालील- खुशी पाटील (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) वि. वि. गौरी खोत (कोल्हापूर पब्लिक), श्रावणी तोडकर (न्यू मॉडेल इंग्लिश) वि. वि. अदिती नायर (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई), आर्या कुकडे (पोदार इंटरनॅशनल) वि. वि. अर्चा आफळे (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन), प्रेरणा कुलकर्णी (प्रायव्हेट) वि. वि. नूपुर खांडकर (महावीर इंग्लिश).


​ ​

संबंधित बातम्या