Schoolympics 2019 : तेजसचा सुवर्णपदकांचा चौकार श्रीवर्धन, जयने पटकाविली दोन सुवर्णपदके 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. सागर पाटील जलतरण तलावावर स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

कोल्हापूर - सोळा वर्षाखालील मुलांच्या जलतरण स्पर्धेत तेजस मानेने विविध प्रकारांत चार सुवर्णपदके पटकावली. बारा वर्षांखालील गटात श्रीवर्धन पाटील, तर चौदा वर्षांखालील गटात जय शहाने दोन सुवर्णपदके मिळवली.  चिन्मय सूर्यवंशी, तनिष्क आयरे यांनीही बाजी मारली. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. सागर पाटील जलतरण तलावावर स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

निकाल अनुक्रमे असा (कंसात शाळा) : १२ वर्षाखालील (४ बाय ५० रिले मिडले) - संजय घोडावत इंटरनॅशनल (सीबीएसई) स्कूल - आरूष बोंद्रे, रणवीर चव्हाण, विश्‍वजीत कमलाकर, शिवेन लुनानी. 
५० मीटर बॅकस्ट्रोक - श्रीवर्धन पाटील (सेंट झेवियर्स), पृथ्वी इंगळे (छत्रपती शाहू, सीबीएसई), उज्जल पटेल (पोदार इंटरनॅशनल).
२०० मीटर वैयक्तिक मिडले - श्रीवर्धन पाटील (सेंट झेवियर्स), पृथ्वी इंगळे (छत्रपती शाहू, सीबीएसई), साहील शेळके (छत्रपती शाहू, एसएससी), आर्यवीर पाटील (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन), रूद्र मनाडे (विबग्योर). १४ वर्षाखालील - २०० मीटर वैयक्तिक मिडले - चिन्मय सूर्यवंशी (सेंट झेवियर्स), श्रावण पेठे (छत्रपती शाहू, एसएससी), तनिष्क आयरे (महाराष्ट्र), पुष्कर गवळी (लक्ष्मीबाई जरग), जय सहा (छत्रपती शाहू, सीबीएसई). २०० मीटर फ्री स्टाईल - तनिष्क आयरे, चिन्मय सूर्यवंशी, पार्थ काटे (छत्रपती शाहू, सीबीएसई), निखिल पोवार (भोगावती).
१०० मीटर बटरफ्लाय - जय शहा, चिन्मय सूर्यवंशी, निखिल पोवार. ५० मीटर बॅकस्ट्रोक - रोहित शहा (छत्रपती शाहू, सीबीएसई), श्रावण पेठे, तनिष्क आयरे.  
१६ वर्षांखालील- २०० मीटर वैयक्तिक मिडले- तेजस माने (रॉयल इंग्लिश मीडियम), सुजल पाटील (हनुमंतराव चाटे), बालाजी पाटील (शांतिनिकेतन), इंद्रजित परमेकर (विमला गोएंका इंग्लिश मीडियम), धैर्यशील भोसले (एस. एम. लोहिया). २०० मीटर फ्री स्टाईल - तेजस माने, बालाजी पाटील, धैर्यशील भोसले, सूर्याजी बोडके (विमला गोएंका), सुजल पाटील. १०० मीटर बटरफ्लाय - तेजस माने, बालाजी पाटील, धैर्यशील भोसले. ५० मीटर बॅक स्ट्रोक - तेजस माने, धैर्यशील भोसले, 
इंद्रजित परमेकर.


​ ​

संबंधित बातम्या