Schoolympics 2019 : ज्ञानेश्‍वरी, श्रेया अंतिम फेरीत 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 November 2019

‘सकाळ माध्यम’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

कोल्हापूर - चौदा वर्षांखालील मुलांच्या एकेरी टेनिस स्पर्धेत ओम बुरगे व अश्‍विन नरसिंघाणी, तर मुलींच्या गटात ज्ञानेश्‍वरी चौगुले व श्रेया देशपांडेने अंतिम फेरीत आज प्रवेश केला. ‘सकाळ माध्यम’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या ओम बुरगेने सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरीच्या आयुष पाटीलला ८-२; तर छत्रपती शाहू विद्यालयाच्या (सीबीएसई) अश्‍विन नरसिंघाणीने श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमीच्या तन्मय देशपांडेला ८-३ गुणफरकाने हरविले. मुलींत गॅलॅक्‍सी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या ज्ञानेश्‍वरी चौगुलेने होलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलच्या वंशिका पाटीलला ८-२, तर छत्रपती शाहू विद्यालयाच्या (सीबीएसई) श्रेया देशपांडेने डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतनच्या मैत्रेयी इंगळेला ८-२ गुणफरकाने पराभूत केले.


​ ​

संबंधित बातम्या