Schoolympics 2019 जान्हवी- प्रांजली, सोनल - रिषी फायनलला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 November 2019

दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सोनल पाटील व रिषी ठक्करने संजय घोडावत इंटरनॅशनल केंब्रिज स्कूलच्या अस्मी बनकर व वाणी मेहतावर ८-०ने बाजी मारली.

कोल्हापूर - सोळा वर्षांखालील मुलींच्या दुहेरी टेनिस स्पर्धेत जान्हवी चाटे व प्रांजली कोटलवार, सोनल पाटील व रिषी ठक्करने अंतिम फेरीत आज धडक मारली. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत टेनिस स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरू आहे. 

संजय घोडावत इंटरनॅशनल केंब्रिज स्कूलच्या जान्हवी चाटे व प्रांजली कोटलवारने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या स्नेहा मोदी व प्राजक्ता पाटीलचा ७-५, ८-७ गुणफरकाने पराभव केला. दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सोनल पाटील व रिषी ठक्करने संजय घोडावत इंटरनॅशनल केंब्रिज स्कूलच्या अस्मी बनकर व वाणी मेहतावर ८-०ने बाजी मारली.


​ ​

संबंधित बातम्या