Schoolympics 2019 : कौशिक, कृष्णा, अंकित, फायनलला 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स स्पर्धेंतर्गत टेनिस स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर स्पर्धा सुरू आहे. 

कोल्हापूर - सोळा वर्षांखालील मुलांच्या दुहेरी टेनिस स्पर्धेत कौशिक चौगुले व कृष्णा मानधने, अंकित भटेजा व प्रथमेश पाटील, स्पंदन बरगे व स्पर्श जैन, तर सुजल गोयल व कुशल सारडाने उपांत्य फेरीत आज प्रवेश केला. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स स्पर्धेंतर्गत टेनिस स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर स्पर्धा सुरू आहे. 

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या (सीबीएसई) कौशिक चौगुले व कृष्णा मानधनेने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या (सीबीएसई) प्रथमेश लाहोटी व अदित्य पाटीलला ६-२, छत्रपती शाहू विद्यालयाच्या (सीबीएसई) अंकित भटेजा व प्रथमेश पाटीलने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या जीत गाला व सिद्धी जमादारला ६-० गुणफरकाने पराभूत केले. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या (सीबीएसई) स्पंदन बरगे व स्पर्श जैनने संजय घोडावत इंटरनॅशनल केंब्रिज स्कूलच्या सिद्धसेनराजे भोसले व ऋषभ मिरजीला ६-१ गुणफरकाने धक्का दिला. संजय घोडावत इंटरनॅशनल केंब्रिज स्कूलच्या सुजल गोयल व कुशल सारडाला प्रतिस्पर्धी न आल्याने पुढे चाल मिळाली.


​ ​

संबंधित बातम्या