Schoolympics 2019 : अरिहिंजय, सार्थक अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 November 2019

कोल्हापूर  - १२ वर्षांखालील मुलांच्या एकेरी टेनिस स्पर्धेत डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतनच्या अरिहिंजय पाटील व हनुमंतराव चाटे स्कूलच्या सार्थक गायकवाडने अंतिम फेरीत आज धडक मारली. दुहेरीत वर्धन कवडे व सन्मित शेतनाने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. ‘सकाळ माध्यम समूह’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. विभागीय क्रीडासंकुलातील टेनिस कोर्टवर टेनिस स्पर्धेचे आयोजन केले आहे.

अरिहिंजय पाटीलने विबग्योर हायस्कूलच्या अभंग फडणीसवर ८-४, तर सार्थक गायकवाडने सेंट झेवियर्स हायस्कूलच्या सिद्धार्थ फराकटेवर ८-०ने मात केली. दुहेरीत हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूलच्या वर्धन कवडे व सन्मित शेतनाने संजय घोडावत इंटरनॅशनल केंब्रिज स्कूलच्या गणेश चव्हाण व हितेश मसुटेचा ६-५, ७-३ने पराभव केला.

​ ​

संबंधित बातम्या