Schoolympics 2019 : चैतन्य, श्रीशैल, आयुष उपांत्यपूर्व फेरीत; तन्मय, अमन आणि अश्‍विनचीही आगेकूच 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 November 2019

‘सकाळ माध्यम समूह’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा

कोल्हापूर - १४ वर्षांखालील मुलांच्या एकेरी टेनिस स्पर्धेत चैतन्य ठाणेदार, श्रीशैल शिरहट्टी, आयुष पाटील, तन्मय देशपांडे, अमन तुराकिया व अश्‍विन नरसिंघाणीने उपांत्यपूर्व फेरीत आज प्रवेश केला. 
‘सकाळ माध्यम समूह’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. विभागीय क्रीडासंकुलातील टेनिस कोर्टवर टेनिस स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

निकाल असा :

चैतन्य ठाणेदार (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई) वि. वि. क्रिशिव खेमकर (संजय घोडावत इंटरनॅशनल केंब्रिज स्कूल) (६-०), श्रीशैल शिरहट्टी (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई) वि. वि. वर्धन पाटील (संजय घोडावत इंटरनॅशनल केंब्रिज स्कूल) (६-०), आयुष पाटील (सेव्हंथ डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूल) वि. वि. सागर काटवे (विमला गोएंका इंग्लिश मीडियम स्कूल) (६-१), तन्मय देशपांडे (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकडमी सेकंडरी सेक्‍शन) वि. वि. तनिष जाधव (प्रायव्हेट इंग्लिश स्कूल) (६-०), अमन तुराकिया (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. संकल्प पवार (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) (६-५, ७-२), अश्‍विन नरसिंघाणी (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई) वि. वि. समर्थ यादव (विमला गोएंका इंग्लिश मीडियम स्कूल) (६-०).
 


​ ​

संबंधित बातम्या