Schoolympics 2019 : तायक्वाँदो स्पर्धेत समृद्धी, अंजुमरा,  सानिका, साक्षीला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 November 2019

१६ वर्षांखालील मुलींच्या तायक्वाँदो स्पर्धेत समृद्धी बारटक्‍के, अंजुमरा महात, सानिका लंबे, हर्षला नालंग, वैष्णवी सुतार, साक्षी बेनके, भूमी शिंदेने आपापल्या वजनगटात सुवर्णपदकावर नाव कोरले.

कोल्हापूर :  १६ वर्षांखालील मुलींच्या तायक्वाँदो स्पर्धेत समृद्धी बारटक्‍के, अंजुमरा महात, सानिका लंबे, हर्षला नालंग, वैष्णवी सुतार, साक्षी बेनके, भूमी शिंदेने आपापल्या वजनगटात सुवर्णपदकावर नाव कोरले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात तायक्वाँदो स्पर्धा झाली. ‘सकाळ माध्यम समूह’ प्रस्तुत ही स्पर्धा आहे. 

निकाल अनुक्रमे असा :

४२ किलो - समृद्धी बारटक्के (कोल्हापूर इंग्लिश स्कूल), शीतल ऱ्हायकर (संकल्प माध्यमिक विद्यालय), श्रीशा होगळे (दानोळी हायस्कूल), रूचा ललित (एम. एल. जी. हायस्कूल).

४४ किलो - अंजुमरा महात (दानोळी हायस्कूल), अमृता खोडवे (न्यू इंग्लिश स्कूल), केतकी पोवार (प्रियदर्शनी इंदिरा हायस्कूल), वेदिका भोपळे (खेबवडे हायस्कूल).

४६ किलो - सानिका लंबे (दानोळी हायस्कूल).

४९ किलो - हर्षला नालंग (कळंबा हायस्कूल). समृद्धी पोवार (दानोळी हायस्कूल), समृद्धी पटेकर (वसंतराव देशमुख हायस्कूल), रसिका कावळे (संकल्प माध्यमिक विद्यालय). 

५२ किलो - वैष्णवी सुतार (संकल्प माध्यमिक विद्यालय), राजश्री शिराळे (दानोळी हायस्कूल).

५५ किलो - साक्षी बेनके (माध्यमिक विद्यालय), सानिधी गाडे (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल), संजीवनी निरलकेरी (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल).

५९ किलो - भूमी शिंदे (विमल इंग्लिश हायस्कूल), सानिया गांधी (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल), तनिष्का सोनकर (वसंतराव देशमुख हायस्कूल), अमृता परीट (यशवंतराव घाटगे हायस्कूल).


​ ​

संबंधित बातम्या