Schoolympics 2019 : जय शहा, बालाजी पाटीलचा डबल धमाका

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 November 2019

श्रीवर्धन, आर्यवीर पाटील, श्रावण पेठे, तेजस मानेनेही पटकाविले सुवर्ण..

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स अंतर्गत सागर पाटील जलतरण तलावावर ही स्पर्धा होत आहे.

कोल्हापूर - मुलांच्या जलतरण स्पर्धेत चौदा वर्षांखालील गटात जय शहा, तर सोळा वर्षांखालील गटात बालाजी पाटीलने दोन सुवर्णपदके पटकाविली. बारा वर्षांखालील मुलांच्या जलतरण स्पर्धेत श्रीवर्धन पाटील व आर्यवीर पाटील, चौदा वर्षांखालील श्रावण पेठे व सोळा वर्षांखालील गटात तेजस मानेने सुवर्णपदक मिळविले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स अंतर्गत सागर पाटील जलतरण तलावावर ही स्पर्धा होत आहे.

निकाल अनुक्रमे असा :

१२ वर्षांखालील - ४ बाय ५० मीटर रिले फ्री स्टाईल - संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) - आरुष बोंद्रे, रणवीर चव्हाण, विश्‍वजित कमलाकर, समर्थ वाघमोडे. १०० मीटर फ्री स्टाईल - श्रीवर्धन पाटील (सेंट झेवियर्स), साहील शेळके (छत्रपती शाहू, एसएससी), आर्यवीर पाटील (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज, शांतिनिकेतन). ५० मीटर ब्रेक स्ट्रोक - आर्यवीर पाटील, पृथ्वीराज इंगळे (छत्रपती शाहू, सीबीएसई), श्रीवर्धन पाटील (सेंट झेवियर्स). १४ वर्षांखालील - ४ बाय ५० मीटर रिले फ्री स्टाईल - संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) - रोहन हिटमलानी, मोहित जाधव, हर्षवर्धन जिरगे, अरुण कदम. भाई सी. बी. पाटील विद्यालय - ओमकार पाटील, सिद्धेश पाटील, सुहास पाटील, साहील शिंदे. १०० मीटर फ्री स्टाईल - श्रावण पेठे (छत्रपती शाहू, एसएससी), चिन्मय सूर्यवंशी (सेंट झेवियर्स), तनिष्क आयरे (महाराष्ट्र). १०० मीटर बॅकस्ट्रोक - जय शहा (छत्रपती शाहू, सीबीएसई), पार्थ काटे (छत्रपती शाहू, सीबीएसई), तनिष्क आयरे. ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक - जय शहा, पुष्कर गवळी (लक्ष्मीबाई जरग), तनिष्क आयरे. 
१६ वर्षांखालील - ४ बाय १०० मीटर रिले फ्री स्टाईल - संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) - पृथ्वीराज चव्हाण, अमेय धुपकर, पृथ्वीराज कराडे, यश पाटील. छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी) - प्रतीक बेडेकर, आर्जव पाटील, स्वरूप पाटील, आर्यन फडतारे. १०० मीटर फ्री स्टाईल - बालाजी पाटील (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज, शांतिनिकेतन), तेजस माने (रॉयल इंग्लिश मीडियम), सूर्याजी बोडके (विमला गोएंका इंग्लिश). १०० मीटर बॅक स्ट्रोक - तेजस माने, सुजल पाटील (हनुमंतराव चाटे), अमेय धुपकर. ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक - बालाजी पाटील, इंद्रजित परमेकर (विमला गोएंका), 
ओमकार इंगळे (अल्फान्सो).  


​ ​

संबंधित बातम्या