Schoolympics 2019 : अथर्व, अभिजित, अक्षयला विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 November 2019

आदित्य, रणवीर, समर्थनेही जिंकले जेतेपद

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजवर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 

कोल्हापूर - चौदा वर्षांखालील मुलांच्या नेमबाजी स्पर्धेत अथर्व बेलवाडीकर, अभिजित कांबळे, अक्षय कामत, तर १६ वर्षांखालील गटात अादित्य देसाई, रणवीर काटकर व समर्थ मंडलिकने विजेतेपद पटकाविले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजवर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 

निकाल अनुक्रमे असा (कंसात शाळा) :

१४ वर्षांखालील ः ओपन साईट एअर रायफल १० मीटर ः अथर्व बेलवाडीकर (पोदार इंटरनॅशनल), राजवर्धन जगदाळे (चाटे स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स), ऋषीकेश बोंगाळे (होलीडेन इंग्लिश मीडियम). पीप साईट एअर रायफल १० मीटर ः अभिजित कांबळे (महाराष्ट्र), राजवर्धन पाटील (पॅरामाऊंट इंग्लिश मीडियम), प्रद्युम्न पाटील (आदर्श गुरुकुल विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज). एअर पिस्टल १० मीटर ः अक्षय कामत (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी), अथर्व भिवसे (सेंट झेवियर्स), आरमान अरवाडे (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज). 

१६ वर्षांखालील ः ओपन साईट एअर रायफल १० मीटर ः अादित्य देसाई (पॅरामाऊंट इंग्लिश मीडियम), समर्थ पाटील (एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज), अथर्व आंग्रे (विद्यापीठ हायस्कूल). पीप साईट एअर रायफल १० मीटर ः रणवीर काटकर (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन), प्रियांशू बेदरे (सेव्हंथ डे ॲडव्हेंटिस्ट), प्रसाद भोसले (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी). एअर पिस्टल १० मीटर ः समर्थ मंडलिक (महाराष्ट्र), अथर्व निंबाळकर (व्यंकटेश इंग्लिश), मोहम्मदशफीन शेख (अल्फान्सो).


​ ​

संबंधित बातम्या