Schoolympics 2019 : तनिष्का, महिमा फायनलला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 November 2019

‘सकाळ माध्यम समूह’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा

कोल्हापूर - १२ वर्षांखालील मुलींच्या एकेरी टेनिस स्पर्धेत तनिष्का देशपांडे व महिमा शिर्केने अंतिम फेरीत आज धडक मारली. ‘सकाळ माध्यम समूह’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. विभागीय क्रीडासंकुलात टेनिस स्पर्धेचे आयोजन केले आहे. 
कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या तनिष्का देशपांडेने डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतनच्या श्रेया रावला ८-२, तर सेव्हंथ हे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूलच्या महिमा शिर्केने डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतनच्या ऐश्‍वर्या दिघेचा ८-६ गुणफरकाने पराभव केला.

 


​ ​

संबंधित बातम्या