Schoolympics 2019 : ‘शिवराज’चा ‘कळंबा’वर विजय

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 December 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा  शिंगणापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशालेच्या मैदानावर सुरू आहे.

कोल्हापूर - मुलींच्या खो-खो स्पर्धेतील साखळी फेरीत राजर्षी शाहू प्रशाला, दानोळी, शिवराज, दत्ताबाळ इंग्लिश व आनंद सेमी इंग्लिश स्कूलने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर आज मात केली. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा  शिंगणापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशालेच्या मैदानावर सुरू आहे.

निकाल असा : राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला वि. वि. दत्ताबाळ हायस्कूल (९-०), दानोळी हायस्कूल वि. वि. आनंद सेमी इंग्लिश स्कूल (१२-१), राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला वि. वि. दानोळी हायस्कूल (१२-०), शिवराज इंग्लिश मीडियम स्कूल वि. वि. कळंबा गर्ल्स हायस्कूल (४-२), दत्ताबाळ इंग्लिश मीडियम स्कूल वि. वि. आदर्श गुरूकुल विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज (२-१), आनंद सेमी इंग्लिश स्कूल वि. वि. दत्ताबाळ हायस्कूल (४-३).
 शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलला आदर्श गुरुकुल विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज, कळंबा गर्ल्स हायस्कूलला संजीवन पब्लिक स्कूल, दत्ताबाळ हायस्कूलला न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, तर आदर्श गुरूकुल अँड ज्युनिअर कॉलेजला संजीवन पब्लिक स्कूलविरुद्धच्या सामन्यात पुढे चाल मिळाली.


​ ​

संबंधित बातम्या