Schoolympics 2019 : दत्ताबाळ, दानोळी, कळंबा, शिवराजची विजयी सलामी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 December 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. शिंगणापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन ॲण्ड निवासी क्रीडा प्रशालेच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन केले आहे.

कोल्हापूर - मुलींच्या खो-खो स्पर्धेतील साखळी फेरीत राजर्षी शाहू प्रशाला, दानोळी, कळंबा, दत्ताबाळ इंग्लिश, शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलने विजयी सलामी दिली. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. शिंगणापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन ॲण्ड निवासी क्रीडा प्रशालेच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन केले आहे.

 निकाल असा : राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन ॲण्ड निवासी क्रीडा प्रशाला वि. वि. आनंद सेमी इंग्लिश स्कूल (१२-२), दानोळी हायस्कूल वि. वि. दत्ताबाळ हायस्कूल (१५-२), कळंबा गर्ल्स हायस्कूल वि. वि. आदर्श गुरुकुल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (१०-४), दत्ताबाळ इंग्लिश मीडियम स्कूल वि. वि. कळंबा गर्ल्स हायस्कूल (१३-१), दानोळी हायस्कूल वि. वि. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल (८-०), राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला वि. वि. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल (१७-०), शिवराज इंग्लिश मीडियम स्कूल वि. वि. दत्ताबाळ इंग्लिश मीडियम स्कूल (९-८), आनंद सेमी इंग्लिश स्कूल वि. वि. न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल (१३-१३, टायब्रेकर १-०). शिवराज इंग्लिश स्कूलला संजीवन स्कूलविरुद्ध, तर दत्ताबाळ स्कूलला संजीवन पब्लिक स्कूलविरुद्धच्या सामन्यात पुढे चाल मिळाली.


​ ​

संबंधित बातम्या