Schoolympics 2019 : केदार, भिकाजी, अद्वैत, हर्षवर्धनला सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत ज्यूदो स्पर्धा झाली. सकाळ माध्यम समूह प्रस्तुत ही स्पर्धा शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात झाली.

कोल्हापूर - सोळा वर्षांखालील मुलांच्या ज्यूदो स्पर्धेत केदार सुभेदार, भिकाजी हराळे, अद्वैत पोतदार, हर्षवर्धन गाडेकर, नीरज कांबळे, साहिल पाटील, आदित्य मसुटे, सोहम पाटील, अभिजित नवाळे यांनी आपापल्या वजनगटात सुवर्णपदकावर आज नाव कोरले. 

निकाल अनुक्रमे असा :

४५ किलो - केदार सुभेदार (छत्रपती शाहू विद्यालय, एसएससी), कृष्णात पोतदार (एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज), व्यंकटेश सोनटक्‍के (मराठी मीडियम हायस्कूल), कीर्ती दुगड (विबग्योर हायस्कूल). ५० किलो -भिकाजी हराळे (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज), प्रसन्न सिदनाळ (ओरिएंटल इंग्लिश ॲकॅडमीज हायस्कूल), स्वयम पाटील (विमला गोएंका इंग्लिश मीडियम स्कूल), यश चोपडे (हनुमंतराव चाटे स्कूल). ५५ किलो - अद्वैत पोतदार (एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज), विवेक गोटे (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज), गौरव मिठारी (ओरिएंटल इंग्लिश ॲकॅडमीज हायस्कूल), चैतन्य जौंगले (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई). ६० किलो - हर्षवर्धन गाडेकर (गारगोटी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज), श्रीनाथ पाटील (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज), अभिनंदन बाऊदने (प्रबुद्ध भारत हायस्कूल), विघ्नेश सारंग (संजीवन पब्लिक स्कूल). ६६ किलो - नीरज कांबळे (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज), पार्थ जाधव (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई), ओजस खाडे (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई), नौमन मोमीन (विबग्योर हायस्कूल). ७३ किलो - साहिल पाटील (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज), अनय चव्हाण (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई). ८१ किलो - आदित्य मसुटे (विबग्योर), करण चव्हाण (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई), संग्रामसिंह कदम (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई). ९० किलो - सोहम पाटील (न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल). ९० किलोवरील - अभिजित नवाळे (संजीवन पब्लिक स्कूल).


​ ​

संबंधित बातम्या