Schoolympics 2019 : केतकीला चार, तर पूजाला तीन सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धा केएसएच्या हॉलमध्ये झाली. 

कोल्हापूर - सोळा वर्षांखालील मुलींच्या जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलच्या केतकी चरापलेने चार, तर चौदा वर्षांखालील गटात पूजा माने हिने तीन सुवर्णपदके पटकावली. स्वरूपा सुर्वे, योगिता शिंदे, स्वरदा नाईक यांनी सुवर्णपदके मिळवली. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धा केएसएच्या हॉलमध्ये झाली. 
निकाल अनुक्रमे असा (कंसात शाळा) - १४ वर्षांखालील - बॅलेन्सिंग बीम - स्वरूपा सुर्वे (प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स), सान्वी बुजरे (छत्रपती शाहू, एसएससी), पूजा माने (महाराष्ट्र). व्हॉल्टिंग हॉर्स - योगिता शिंदे (लक्ष्मीबाई जरग), पूजा माने, स्नेहा पाटील (छत्रपती शाहू, एसएससी). अनइव्हन बार - पूजा माने, योगिता शिंदे, तन्वी चौगुले (होलीक्रॉस कॉन्व्हेंट). फ्लोअर एक्‍सरसाइज - पूजा माने, योगिता शिंदे, स्नेहा पाटील. ओव्हरऑल - पूजा माने, योगिता शिंदे, स्वरूपा सुर्वे. 

१६ वर्षांखालील -  बॅलेन्सिंग बीम - केतकी चरापले, स्वरदा नाईक (छत्रपती शाहू, एसएससी), सृष्टी ढोले (छत्रपती शाहू, एसएससी).  
व्हॉल्टिंग हॉर्स - केतकी चरापले, स्वरदा नाईक, सृष्टी ढोले. अनइव्हन बार - केतकी चरापले, स्नेहल घुंटे, सृष्टी ढोले. फ्लोअर एक्‍सरसाइज - स्वरदा नाईक, केतकी चरापले, प्रदीप ढोले. ओव्हरऑल - केतकी चरापले, स्वरदा नाईक, सृष्टी ढोले.


​ ​

संबंधित बातम्या