Schoolympics 2019 : नरके, लोहिया उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 December 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू असून, सकाळ माध्यम समूह प्रस्तुत ही स्पर्धा आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे.

कोल्हापूर - मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र, डी. सी. नरके, शांतिनिकेतन व एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने उपांत्य फेरीत आज प्रवेश केला. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू असून, सकाळ माध्यम समूह प्रस्तुत ही स्पर्धा आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे.

 निकाल असा : महाराष्ट्र हायस्कूल वि. वि. प्रायव्हेट इंग्लिश स्कूल (३-०, महाराष्ट्रकडून गंधर्व चव्हाणचे दोन, तर ओमकार ताटेचा एक गोल), डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज वि. वि. संजीवन पब्लिक स्कूल (१-०, श्रीराज खराडेचा गोल), डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन वि. वि. व्ही. डी. शिंदे हायस्कूल (३-०, शांतिनिकेतनकडून पद्मराज पाटील, आयुष पाटील, चंद्रसेन चव्हाणचा गोल), एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वि. वि. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) (१-०, लोहिया हायस्कूलकडून आदित्य शिंदेचा गोल).


​ ​

संबंधित बातम्या