Schoolympics 2019 : शांतिनिकेतन, महाराष्ट्र,  नरकेची प्रतिस्पर्ध्यांवर मात

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 December 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स अंतर्गत छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

कोल्हापूर - मुलांच्या फुटबॉल स्पर्धेतील साखळी फेरीत शांतिनिकेतन, महाराष्ट्र, व्ही. डी. शिंदे हायस्कूल, डी. सी. नरके, छत्रपती शाहू (एसएससी), एस. एम. लोहिया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने प्रतिस्पर्ध्यांचा आज पराभव केला. ओरिएंटल इंग्लिश ॲकॅडमीज हायस्कूल व संजीवन पब्लिक स्कूलला प्रतिस्पर्धी मैदानात न आल्याने पुढे चाल मिळाली. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स अंतर्गत छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतनने प्रायव्हेट इंग्लिश स्कूलवर १-०ने मात केली. त्यांच्या आयुष पाटीलचा गोल निर्णायक ठरला. महाराष्ट्र हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालयावर (सीबीएसई) ३-०ने मात केली. त्यांच्या संकेत मेढेने १६ व ३४, तर गंधर्व चव्हाणने १९ व्या मिनिटाला गोल केला. व्ही. डी. शिंदे हायस्कूलने न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलला १-०ने हरविले. त्यांच्या सुहास जगतापने १८ व्या मिनिटाला गोल करत संघाला विजय मिळवून दिला. डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेजने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा (सीबीएसई) २ विरुद्ध १ गोलफरकाने पराभव केला. घोडावतकडून अर्जुन काळेने ११, तर नरकेकडून शिराज खराडेने ३५, तर यश दाभोळकरने ३९ व्या मिनिटाला गोल केला. छत्रपती शाहू विद्यालयाने (एसएससी) महावीर इंग्लिश स्कूलला २ विरुद्ध १ गोलफरकाने पराभूत केले. महावीरकडून संदेश लव्हटेने २१, तर शाहूकडून अदित्य कल्लोळी २९, हर्ष माळीने ३४ व्या मिनिटाला गोल नोंदवला. एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज विरुद्ध जागृती हायस्कूलला पराभव पत्करावा लागा. एस. एम. लोहिया हायस्कूलने जागृती हायस्कूलला २-०ने पराभूत केले. त्यांच्या आदित्य शिंदेने १० व १९ व्या मिनिटाला गोल केला.


​ ​

संबंधित बातम्या