Schoolympics 2019 : संजय घोडावत स्कूल विजयी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 December 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत पोलो मैदानावर स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

कोल्हापूर - मुलींच्या फुटबॉल स्पर्धेतील साखळी फेरीत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने (सीबीएसई) विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूलवर आज मात केली. अन्य सामन्यांत छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी), देवाळे विद्यालय, उषाराजे हायस्कूल व पोदार इंटरनॅशनल स्कूलला पुढे चाल मिळाली. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत पोलो मैदानावर स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने (सीबीएसई) विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूलला १-० ने हरविले. त्यांच्या वैष्णवी अंधारेने २५ व्या मिनिटाला गोल केला. तोच निर्णायक ठरला. छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी) विरुद्धच्या सामन्यात छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी), देवाळे हायस्कूल विरुद्ध रयत गुरुकुल पब्लिक स्कूल, उषाराजे हायस्कूल विरुद्ध रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल व पोदार इंटरनॅशनल स्कूल विरुद्ध रयत गुरुकुल पब्लिक स्कूलचा संघ मैदानात हजर राहिला नाही.


​ ​

संबंधित बातम्या