Schoolympics 2019 : महाराष्ट्र, शांतिनिकेतनची प्रतिस्पर्ध्यांवर मात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ प्रस्तुत ही स्पर्धा आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

कोल्हापूर - मुलांच्या फुटबॉल स्पर्धेतील साखळी फेरीत महाराष्ट्र, संजय घोडावत इंटरनॅशनल, शांतिनिकेतन, एस. एम. लोहिया हायस्कूलने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर आज मात केली. 
छत्रपती शाहू विद्यालय (सीबीएसई) विरुद्ध व्ही. डी. शिंदे स्कूल व डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज व छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी) यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ प्रस्तुत ही स्पर्धा आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

निकाल असा :

महाराष्ट्र हायस्कूल वि. वि. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल (२-०, महाराष्ट्रकडून गंधर्व चव्हाण, अदित्य लायकरचा गोल), संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) वि. वि. महावीर इंग्लिश स्कूल (१-०, घोडावत स्कूलकडून रोहित जाधवचा गोल), डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन वि. वि. सेंट झेवियर्स हायस्कूल (१-०, शांतिनिकेतनकडून रौनक तिवळेचा गोल), एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वि. वि. एकलव्य पब्लिक स्कूल (१-०, एस. एम. लोहियाकडून विश्‍वदीप भोसलेचा गोल).


​ ​

संबंधित बातम्या