Schoolympics 2019 : गोएंका, न्यू मॉडेल, विबग्योरची विजयी सलामी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

कोल्हापूर - मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत विमला गोएंका, न्यू मॉडेल, छत्रपती शाहू (सीबीएसई), व्ही. डी. शिंदे, विबग्योर, छत्रपती शाहू (एसएससी) व संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने (सीबीएसई) आज विजयी सलामी दिली. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

निकाल असा :

विमला गोएंका इंग्लिश मीडियम स्कूल वि. वि. सेव्हंथ डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूल (टायब्रेकर ४-३, विमला गोएंकाकडून हर्षल ओतारी, अादित्यराज खाडे, सार्थक ओसवाल, हर्षवर्धन समर्थ, तर सेव्हंथ डेकडून अनुराग मोरे, मिथिलेश कोरोचीकर, चेतन नागराजचा गोल). न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल वि. वि. चाटे स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (५-०, न्यू मॉडेलकडून आर्यन अत्तारची हॅट््ट्रीक, प्रितम गुलेदचे दोन गोल). छत्रपती शाहू विद्यालय (सीबीएसई) वि. वि. प्रायव्हेट हायस्कूल (१-०, शाहूकडून सतेज कोगेकरचा गोल). व्ही. डी. शिंदे हायस्कूल वि. वि. रयत गुरुकुल पब्लिक स्कूल (३-०, व्ही. डी. शिंदेकडून सिद्धांत जाधव, पार्श्‍व मांगुरे, यश खोतचा गोल). विबग्योर हायस्कूल वि. वि. शिवराज इंग्लिश मीडियम स्कूल (२-०, विबग्योरकडून क्रिश पाटील व वेदांत सदमाकेचा गोल). छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी) वि.वि. ज्योतिर्लिंग विद्यानिकेतन (४-२, शाहूकडून साई कारंडे, इंद्रनील पाटील, आदित्य कल्लोळी, प्रतीक बेडेकर, तर ज्योतिर्लिंगकडून रोहित कळंत्रे, प्रणव लंबेचा गोल). संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) वि. वि. प्रबुद्ध भारत हायस्कूल (३-०, घोडावत स्कूलकडून रोहित जाधवचे दोन, अमनुल्ला मणियारचा एक गोल).


​ ​

संबंधित बातम्या