Schoolympics 2019 : सुसंस्कार, न्यू मॉडेल, चाटे, आयर्विन उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 November 2019

‘सकाळ माध्यम समूह’ प्रस्तुत ही स्पर्धा आहे. कदमवाडीतील डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन केले आहे.

कोल्हापूर - मॅप्रो स्कूलिंपिक्‍स क्रिकेट स्पर्धेत सुसंस्कार, हनुमंतराव चाटे, न्यू मॉडेल इंग्लिश व आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूलने आज उपांत्य फेरीत प्रवेश केला. ‘सकाळ माध्यम समूह’ प्रस्तुत ही स्पर्धा आहे. कदमवाडीतील डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन केले आहे. सेंट झेवियर्स हायस्कूलने १० षटकांत पाच गडी गमावून ३९ धावा केल्या. वरद खोडवेने २१ धावा केल्या. सुसंस्कारच्या वरद माळीने दोन गडी बाद केले. सुसंस्कारने ६ षटके दोन चेंडूत ४० धावा फटकावून सामना जिंकला. आदित्य पाटीलने नाबाद २८ धावा केल्या.

हनुमंतराव चाटे स्कूलने ९१ धावांचे आव्हान सेव्हंथ डे ॲडव्हेंटिस्ट सेकंडरी स्कूलसमोर ठेवले. दर्शन पाटीलने नाबाद ५६ धावा केल्या. सेव्हंथ डेला तीन गडी गमावून ८५ धावा करता आल्या. यशराज पाटोळेने नाबाद ३७ धावा केल्या. 
न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलने ८७ धावा केल्या. पार्थ दळवीने सर्वाधिक नाबाद ३४ धावा केल्या. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला (सीबीएसई) ८३ धावा करता आल्या. त्यांच्या ऋषिकेश ठक्करने ६३ धावा ठोकल्या. त्याने तीन चौकार व चार षटकार ठोकले. आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूलने दोन गड्यांच्या मोबदल्यात ९८ धावा केल्या. मतीन शेखने ४२ धावा केल्या. विबग्योरला १० षटकांत ९६ धावा करता आल्या. चिराग निरंकारीने ४३ धावा केल्या.


​ ​

संबंधित बातम्या