Schoolympics 2019 : अवनी, श्रेया, तनिष्का,  अनुष्काचा पुढील फेरीत प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 November 2019

 ‘सकाळ माध्यम’ प्रस्तूत ‘मॅप्रो स्कूलिंपिक्‍स-२०१९’ शालेय क्रीडा स्पर्धा

कोल्हापूर - शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत १२ वर्षांखालील मुलींच्या एकेरी टेनिस स्पर्धेत अवनी जैन, श्रेया राव, तनिष्का देशपांडे, अनुष्का नवगिरेने प्रतिस्पर्ध्यांना हरवत पुढील फेरीत प्रवेश केला. ऐश्‍वर्या दिघेला प्रतिस्पर्धी खेळाडू न आल्याने पुढे चाल मिळाली. टेनिस स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर आज सुरू झाली.

 निकाल असा : अवनी जैन (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. रिद्धी आडमुठे (हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूल) (६-०), श्रेया राव (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) वि. वि. दिया शहा (संजय घोडावत इंटरनॅशनल कॅंब्रिज स्कूल) (६-०), तनिष्का देशपांडे (कोल्हापूर पब्लिक स्कूल) वि. वि. रिफात रेहमान (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) (६-५), अनुष्का नवगिरे (हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूल) वि. वि. तन्वी मेहता (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) (६-१). ऐश्‍वर्या दिघे (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) पुढे चाल.


​ ​

संबंधित बातम्या