Schoolympics 2019 : न्यू इंग्लिश स्कूलसमोर पाटील विद्यालयाचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 December 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत ही स्पर्धा मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू आहे.

कोल्हापूर - मुलींच्या हॉकी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आणि भाई सी. बी. पाटील विद्यालयाने अंतिम फेरीत आज धडक मारली. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत ही स्पर्धा मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू आहे.

 पहिल्या उपांत्य फेरीतील सामना न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज विरूद्ध बळवंतराव यादव हायस्कूल यांच्यात झाला. तो न्यू इंग्लिशने ४-०ने जिंकला. त्यांच्या महानंदा मास्तोळीने २३, समीक्षा शेगुंशी ३१, सानिका माने ३३ व कृष्णा मानेने ३६ व्या मिनिटाला गोल नोंदवला. त्यांच्या धडाकेबाज खेळामुळे यादव हायस्कूलच्या बचावफळीची त्रेधातिरपीट उडाली. यादव हायस्कूलच्या पुढच्या फळीतील खेळाडूंना समन्वय साधता न आल्याने गोल करता आले नाहीत. दुसऱ्या सामन्यात सी. बी. पाटील विद्यालयाने विमला गोएंका इंग्लिश मीडियम स्कूलवर ३-०ने बाजी मारली. पूर्णवेळेत दोन्ही संघांनी दमदार खेळ केला. बचावफळीतील खेळाडूंना चढाया रोखून धरल्याने दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळे सामना पेनल्टी स्ट्रोकवर झाला. सी. बी. पाटील विद्यालयाकडून दीक्षा कांबळे, तन्वी पाटील, सोनाली पाटीलने गोल नोंदवून संघाला विजयी केले.


​ ​

संबंधित बातम्या