पुरात अडकलय कुटुंब अन् साजन झगडतोय सुवर्णासाठी

वृत्तसंस्था
Monday, 20 August 2018

आशियाई स्पर्धेत तब्बल 32 वर्षांनी जलतरणात 200 मीटर बलटफ्लाय प्रकारात सुवर्णपदक मिळवून देण्याच्या तयारीत असलेल्या साजन प्रकाशचे कुटुंबीय मात्र इकडे केरळमध्ये भयंकर पुरात अडकले आहेत. 

जकार्ता : आशियाई स्पर्धेत तब्बल 32 वर्षांनी जलतरणात 200 मीटर बलटफ्लाय प्रकारात सुवर्णपदक मिळवून देण्याच्या तयारीत असलेल्या साजन प्रकाशचे कुटुंबीय मात्र इकडे केरळमध्ये भयंकर पुरात अडकले आहेत. 

जकार्तामध्ये सुरु असणाऱ्या आशियाई स्पर्धेत साजन प्रकाश या भारतीय जलतरणपटूमुऴे 200 मीटर बटरफ्लाय जलतरण प्रकारात भारताची मोहोर उमटली आहे. यापूर्वी 1986 मध्ये खजान सिंगनंतर 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या साजनकडे सर्व भारतीयांचे लक्ष आहे. मात्र, त्याचे लक्ष पुरात अडकलेल्या कुटुंबीयांकडे आहे. इडुक्की येथील साजनच्या कुटुंबातील पाच जण सध्याच्या घडीला बेपत्ता असून, त्यांच्याशी अद्यापही कोणताच संपर्क झालेला नाही. 

साजन त्याच्या आईसोबत पुदुच्चेरी येथे राहतो. त्याची आई सुखरूप असून, तिचे त्याच्याशी बोलणे झाले आहे. मात्र. त्याचे आजोळ हे पेरियार नदीजवळ असून, तेथे त्याची आजी, मामा आणि कुटुंबातील आणखी तीन सदस्य राहतात. पण, गुरुवारपासून त्यांच्याशी कोणताच संपर्क झाला नसून ते बेपत्ता असल्याचे कळत आहे. साजन सतत त्याच्या आईच्या संपर्कात असून, कुटुंबीयांविषयी माहिती घेत आहे.

संबंधित बातम्या