French Open Badminton : भारतीयांसमोर घोडदौड कायम राखण्याचे आव्हान 

वृत्तसंस्था
Thursday, 25 October 2018

फ्रेंच ओपन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विजय मिळविल्यानंतर आज भारताचे किदांबी श्रीकांत, बी साईप्रणित, साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांना दुसऱ्या फेरीतही सातत्य राखण्याचे आव्हान आहे. 

पॅरिस : फ्रेंच ओपन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विजय मिळविल्यानंतर आज भारताचे किदांबी श्रीकांत, बी साईप्रणित, साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांना दुसऱ्या फेरीतही सातत्य राखण्याचे आव्हान आहे. 

स्पर्धेच्या पहिल्या फेरीत चौघांनीही उत्तम कामगिरी करत विजयी सलामी दिली आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. आज किदांबी श्रीकांतचा सामना जागतिक क्रमवारीत 29 व्या स्थानावर असलेल्या कोरियाच्या ली डॉंग क्युनशी आहे. त्यानंतर जागतिक क्रमवारीत 13 व्या स्थानावर असलेल्या इंडोनेशियाचा जोनाटन ख्रिस्ती आणि बी साईप्रणित यांच्यात सामना होईल.

त्यानंतर महिला एकेरीत भारताच्या दोन्ही फुलराण्या आज दुसऱ्या फेरीत खेळ उंचावण्यास सज्ज असतील. आज साईनाचा सामना जपानच्या नोझोमी ओकुहाराशी आहे. मागील आठवड्यातच झालेल्या डेन्मार्क ओपन स्पर्धेत साईनाने जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या ओकुहाराला सहज पराभूत केले होते. त्यानंतर पी. व्ही. सिंधू आणि जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानावर असलेल्या जपानच्या सायाका साटो यांच्यात सामना होईल.  


​ ​

संबंधित बातम्या