French Open Badminton : भारताच्या आशा जवळपास संपुष्टात

वृत्तसंस्था
Saturday, 27 October 2018

भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू साईना नेहवाल, किदांबी श्रीकांत आणि पी. व्ही. सिंधू यांना फ्रेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला. प्रमुख खेळाडूंच्या या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. 

पॅरिस : भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू साईना नेहवाल, किदांबी श्रीकांत आणि पी. व्ही. सिंधू यांना फ्रेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला. प्रमुख खेळाडूंच्या या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. 

गतविजेत्या श्रीकांतला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जपानच्या केन्टो मोमोटाने 16-21, 19-21 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. श्रीकांतला यंदाच्या वर्षांत सलग पाचवेळा जपानच्या खेळाडूविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे. दोन आठवड्यापूर्वी झालेल्या डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत श्रीकांतला मोमोटाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. 

आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक पटकाविल्यानंतर सिंधू सध्या खराब परिस्थितून जात आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिला चीनच्या हि बिंगजिओने 13-21, 16-21 असे सहज पराभूत केले. हा सिंधूचा बिंगजिओविरुद्धचा सलग दुसरा पराभव होता. जूनमध्ये झालेल्या इंडोनेशिया ओपनमध्येही बिंगजिओने सिंधूला पराभूत केले होते. तसेच साईनाला जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या चायनिज तैपेईच्या ताय झू यिंगने 20-22, 11-21 असे पराभूत केले. 

पुरुष दुहेरीमध्ये सात्विक साईराज रान्की रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी भारताच्याच मनू अत्रू आणि सुमित रेड्डीला 21-17, 21-11 असे पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

संबंधित बातम्या