Asian Games 2018 : ऐतिहासिक यशानंतर साईनाला 'स्पेशल गिफ्ट' 

वृत्तसंस्था
Thursday, 30 August 2018

आशियाई क्रीडा स्पर्धेत साईना नेहवालने भारताला बॅंडमिंटन एकेरीतील ऐतिहासिक ब्रॉंझ पदक मिळवून दिले. या कामगिरीनंतर साईनाला तिच्या वडिलांनीही एक स्पेशल गिफ्ट दिले आहे. तिच्या वडिलांनी तिला सोन्याची अंगठी भेट दिली आहे. साईनाने या अंगठीचा फोटो तिच्या ट्विटर अकांउंटवरुन शेअर केला आहे.

जकार्ता : आशियाई क्रीडा स्पर्धेत साईना नेहवालने भारताला बॅंडमिंटन एकेरीतील ऐतिहासिक ब्रॉंझ पदक मिळवून दिले. या कामगिरीनंतर साईनाला तिच्या वडिलांनीही एक स्पेशल गिफ्ट दिले आहे. तिच्या वडिलांनी तिला सोन्याची अंगठी भेट दिली आहे. साईनाने या अंगठीचा फोटो तिच्या ट्विटर अकांउंटवरुन शेअर केला आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत साईनाने 1982नंतर बॅडमिंटन एकेरीतील पहिले पदक पटकावले. तिला उपांत्यफेरीत जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावर असलेल्या तई झु यिंगने सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. मात्र या पराभवनंतरही तिच्या वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण, आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. त्यामुळेच तिच्या वडिलांनी तिला सोन्याची अंगठी भेट केली.


​ ​

संबंधित बातम्या