सिंधू, मरिनला मागे टाकत साईनाची कमाईत भरारी

शैलेश नागवेकर 
Saturday, 30 March 2019

देशांतर्गत स्पर्धांमध्ये तिची पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि तिच्यापेक्षा अधिक प्रायोजक असलेलेल्या सिंधू, आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्धी कॅरोलिना मरिन आणि ताय झू यिंग यांनाही मागे टाकून साईनाने या वर्षांच्या पहिल्या तिमाहीत अधिक कमाई केली आहे. 

नवी दिल्ली :  कश्‍यपबरोबर लग्नगाठ बांधून नवी इनिंग सुरु करणाऱ्या साईना नेहवालने कमाईत भरारी घेण्यास सुरुवात केली आहे. देशांतर्गत स्पर्धांमध्ये तिची पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि तिच्यापेक्षा अधिक प्रायोजक असलेलेल्या सिंधू, आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्धी कॅरोलिना मरिन आणि ताय झू यिंग यांनाही मागे टाकून साईनाने या वर्षांच्या पहिल्या तिमाहीत अधिक कमाई केली आहे. 

अंतिम सामन्यात कॅरोलिना मरिनने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेतील विजेती मलेशिया स्पर्धेत उपांत्य तर ऑल इंग्लंड स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतपर्यंत मजल मारणाऱ्या साईनाने या तिमाहीत 36 हजार 825 डॉलर कमावले आहेत. ऑल इंग्लंड विजेती चीनची चेन युफेई (86,325) पहिल्या क्रमांकावर आहे. तर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली तेपैईची ताय झु यिंग तिसऱ्या क्रमांकावर असून तिची या तिमाहीतल कमाई 36,100 डॉलर इतकी झाली आहे. तर इंडोनेशिया स्पर्धेनंतर न खेळलेली कॅरोलिना मरिन पाचव्या क्रमांकावर आहे. 

सर्वाधिक बक्षिस रक्कमेच्या ऑल इंग्लंड स्पर्धेत पहिल्याच फेरीत आव्हान संपुष्टात आलेली सिंधू फारच मागे पडली आहे, परंतु दिल्लीत सुरु असलेल्या इंडियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले तर सिंधूला प्रगती करता येईल. 

यंदाच्या वर्षातील पहिल्या तीन महिन्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडू (डॉलरमध्ये) 
1) चेन युफेई (86,325) 
2) साईना नेहवाल (36,825) 
3) ताय झु यिंग (36,100) 
4) रॅटचोंक इंतानोन (35,050) 
5) कॅरोरिना मरिन (26,600)  


​ ​

संबंधित बातम्या