French Open Badminton : संघर्षानंतर साईनाचा विजय

वृत्तसंस्था
Thursday, 25 October 2018

पॅरिस : जपानी अडथळा भारतीय सहज पार करू शकतात, हे साईना नेहवालने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवत फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत माजी जगज्जेत्या नोझोमी ओकुहारावर दुसऱ्या फेरीत मात केली. साईनाने ओकुहारावर १०-२१, २१-१४, २१-१५ असा विजय मिळविला.

पहिल्या गेममध्ये ओकुहारानेच पूर्ण वर्चस्व राखले. तिने साईनाला डोके वर काढण्याची संधीही दिली नाही. हा गेम ओकुहाराने २१-१० अशा दणदणीत फरकाने जिंकला.

पण दुसऱ्या गेममध्ये साईनाने कडवा प्रतिकार केला. हा गेम साईनाने २१-१४ असा जिंकला. त्यानंतरच्या तिसऱ्या गेममध्ये दोघींनीही तोडीस तोड खेळ केला. त्यामुळे सामना अखेरपर्यंत चुरशीचा झाला. तिसऱ्या गेमच्या शेवटच्या टप्प्यात साईनाने खेळावर नियंत्रण राखले आणि हा गेम २१-१६ असा जिंकला.

या विजयासह साईनाने 'हेड टू हेड' सामन्यांमधील ओकुहाराविरुद्धचे वर्चस्वही कायम राखले. आतापर्यंत दोघींमध्ये १२ सामने झाले आहेत. त्यापैकी आठ सामन्यांमध्ये साईनाने विजय मिळविला आहे. ओकुहारा सध्या जागतिक क्रमवारीत सहाव्या, तर साईना नवव्या क्रमांकावर आहे.

संबंधित बातम्या