MSDhoni Retire: स्वप्नपूर्तीला हातभार लावणाऱ्या नेतृत्वाच्या निवृत्तीवर सचिनही बोलला  

टीम ई-सकाळ
Saturday, 15 August 2020

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि फलंदाज सुरेश रैना यांनी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती स्वीकारली.

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि फलंदाज सुरेश रैना यांनी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती स्वीकारली. त्यामुळे क्रिकेट जगताला मोठाच धक्का बसला आहे. सुरवातीला महेंद्र सिंह धोनीने इन्स्टाग्राम वर आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर काही वेळानेच भारतीय फलंदाज सुरेश रैनाने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने महेंद्र सिंग धोनी आणि सुरेश रैनाच्या निवृत्तीवर ट्विट केला आहे. 

इंझमामच म्हणतोय, पाकिस्तानी खेळाडूंमध्येच दम नाही  

भारताला आयसीसीच्या तिन्ही क्रिकेट स्पर्धांचे विजेतेपद मिळवून देणारा माजी कर्णधार एम. एस. धोनी याने आज क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावरील ट्विटरवर, भारतीय क्रिकेटमध्ये महेंद्र सिंग धोनीचे योगदान अफाट असल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच 2011 चा वर्ल्डकप एकत्र जिंकणे हा आपल्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट क्षण असल्याचे सचिनने म्हटले आहे. तसेच निवृत्तीनंतर आयुष्यातील दुसऱ्या इनींगसाठी सचिनने महेंद्र सिंग धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत.  

महेंद्र सिंग धोनीच्या नंतर सर्वात प्रथम क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकावणारा भारतीय फलंदाज सुरेश रैनाने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. त्यानंतर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधील सुरेश रैनाच्या कारकिर्दीवर अभिनंदन करताना, सुरेश रैनाच्या कसोटी पदार्पणाच्या वेळेस मैदानावरील भागीदारीची आठवण आणि त्यावेळेस खेळपट्टीवर केलेले संभाषण लक्षात असल्याचे म्हटले आहे.              

 


​ ​

संबंधित बातम्या