'आघाडीला खेळल्यामुळेच सचिनचा दबदबा; सहाव्या क्रमांकावर खेळून तेंडुलकर मोठा झाला नसता'

संजय घारपुरे
Monday, 24 August 2020

तेंडुलकर सहाव्या क्रमांकावरच खेळत राहिला असता तर तो महान फलंदाज झाला नसता, या क्रमांकावर खेळताना पुरेसे चेंडू लाभत नाहीत, असे गांगुली म्हणाले. 

लकता:  सलामीस खेळण्यास सुरुवात झाल्यावर सचिन तेंडुलकरकडून जास्त धावा होण्यास सुरुवात झाली. आपण महेंद्रसिंग धोनीबाबतही हाच निर्णय घेतला, त्यामुळे त्याच्याकडून जास्त धावा होण्यास सुरुवात झाली, असे भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी सांगितले. धोनीने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, त्यावेळी गांगुली भारताचे कर्णधार होते. सुरुवातीच्या काही सामन्यानंतर गांगुलीने धोनीला तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली. विशाखापट्टणमला धोनीने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना पाकिस्तानला 148 धावांचा तडाखा दिला होता. 

धोनी आणि रोहितच्या चाहत्यांमध्ये मारामारी; त्यावर सेहवाग म्हणतो... 
 

धोनीला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाल्यावर त्याने चमकदार शतक झळकावले. जास्त षटके खेळण्याची संधी मिळाली, त्यावेळी त्याने धावाही जास्त केल्या. तेंडुलकर सहाव्या क्रमांकावरच खेळत राहिला असता तर तो महान फलंदाज झाला नसता, या क्रमांकावर खेळताना पुरेसे चेंडू लाभत नाहीत, असे गांगुली म्हणाले. 

बीसीसीआयने धोनीला योग्य वागणूक दिली नाही ; वाचा सविस्तर

चॅलेंजर स्पर्धेत माझ्या संघातून सलामीला खेळताना धोनीने शतक केले होते. त्यामुळे त्याची क्षमता जाणून होतो. आघाडीच्या क्रमांकावर फलंदाजास पाठवल्यासच तो खेळाडू तयार होतो. ड्रेसिंग रुममध्ये बसून काही घडत नाही. धोनीची षटकार मारण्याची खासियत होती. मी त्याला वारंवार वरच्या क्रमांकावर खेळण्यास सांगितले. कारकीर्दीच्या सुरुवातीस त्याने मुक्तपणे खेळणे आवश्‍यकच होते, असे गांगुलीने सांगितले. 
 


​ ​

संबंधित बातम्या