सचिन मलिंगाला म्हणायचा, बाल नही बॉल देखो

वृत्तसंस्था
Tuesday, 28 August 2018

आपल्या गोलंदाजीच्या वेगळ्याच शैलीने क्रिकेट विश्वात वेगळी ओळख निर्माण केलेला श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज (ता. 28) खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई : आपल्या गोलंदाजीच्या वेगळ्याच शैलीने क्रिकेट विश्वात वेगळी ओळख निर्माण केलेला श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज (ता. 28) खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिनने ट्विटरवरून शुभेच्छा देताना म्हटले आहे, की मी जेव्हा मलिंगाविरुद्ध फलंदाजी करण्यात येत होतो. तेव्हा त्याला कायम सांगायचो, केसाकडे बघत बसू नको, बॉलकडे बघ. मित्रा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आपल्या कुरळ्या केसांच्या शैलीमुळे मलिंगा हा जगप्रसिद्ध होता. तसेच त्याची गोलंदाजीची शैलीही वेगळीच होती. सचिन आणि मलिंगा यांनी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या निमित्ताने बराच काळ एकत्र घालविला आहे. त्यामुळे सचिनने आपल्या या मित्राला खास त्याच्याशी निगडीत शैलीतून शुभेच्छा दिल्या आहेत.


​ ​

संबंधित बातम्या