सचिन म्हणतोय ‘उभारा घरी राहण्याच्या दृढ संकल्पाची गुढी’

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 March 2020

कोरोना व्हायरस पसरण्यापासून रोखण्यासाठी सर्वांना पुढचे काही दिवस घरात राहणे अत्यंत आवश्यक असणार आहे. त्यासाठी सगळा देश लॉक डाऊन करण्यात आला आहे. 

कोरोना व्हायरसने जगभरात भयंकर रुप घेतले आहे. जगातल्या सगळ्या व्यवहारावरती या रोगाचा परिणाम झाला आहे. सगळ्या क्रिडा स्पर्धी पुढे ढकलाव्या लागल्या आहेत किंवा रद्द कराव्या लागल्या आहेत. सगळं जग या संकटाचा सामना करत आहे हजारो लोक या आजाराचे बळी ठरत आहेत तर काही जण उपचार घेतल्यावर पुर्णपणे बरे देखील होत आहेत. परिस्थीती आटोक्यात आणण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांना पाडव्याच्या दिवशी घराबाहेर पडता आले नाही.

कोरोनापासून बचावासाठी विराट-अनुष्काचा खास संदेश 

लोकांनी घरातच थांबावे यासाठी सर्व स्तरातून आवाहन करण्यात येत आहे. अनेक दिग्गज क्रिकेटर त्यांच्या सोशल मिडीयावर त्यासंबंधीच्या पोस्ट करत आहेत. सचिनने देखील पाडव्याच्या शुभेच्छा देताना लोकांना घरात थांबावे, रस्त्यावर येऊ नये असे सांगीतले आहे. 

सचिनने पाडव्याच्या शुभेच्छा देणारा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे, त्याच्यासोबत त्याने त्याच्या चाहत्यांसाठी संदेश लिहीला आहे की, ‘आज गुढी पाडवा, मराठी नववर्षाचा पहिला दिवस. नेहमी आपण हा सण मोठ्या उत्साहाने करतो मात्र आज परिस्थिती गंभीर आहे. करोनाशी लढण्यासाठी आपण आपापल्या घरी राहण्याच्या दृढ संकल्पाची गुढी उभारुयात. लवकरात लवकर हे संकट संपेल अशी प्रार्थना करूया. गुढी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.’

पुनियाने कोरोना विरोधात थोपटले दंड; देणार सहा महिन्याचे पगार

कोरोना व्हायरस पसरण्यापासून रोखण्यासाठी सर्वांना पुढचे काही दिवस घरात राहणे अत्यंत आवश्यक असणार आहे. त्यासाठी सगळा देश लॉक डाऊन करण्यात आला आहे. देशात प्रवासकरण्यावर बंधने घालण्यात येत आहेत. मोदींच्या या देश लॉक डाऊवन करण्याच्या निर्णयाचे समर्थन बऱ्यात क्रिकेटपटूंनी केलं आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या