सचिन करतोय चक्क इंग्लंडचे समर्थन, पण कशात?

वृत्तसंस्था
Wednesday, 11 July 2018

भारतीय क्रिकेट संघाचा प्रतिष्ठित इंग्लंड दौरा सुरु असताना मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने मात्र ट्विट करुन इंग्लंडच्या संघाला पाठिंबा दर्शविला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सचिन भारताऐवजी इंग्लंड संघाला पाठिंबा का देत असावा. मात्र सचिनने इंग्लंडला पाठिंबा देणारे हे ट्विट क्रिकेट नव्हे तर फुटबॉल सामन्यासाठी केले आहे.  

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा प्रतिष्ठित इंग्लंड दौरा सुरु असताना मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने मात्र ट्विट करुन इंग्लंडच्या संघाला पाठिंबा दर्शविला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सचिन भारताऐवजी इंग्लंड संघाला पाठिंबा का देत असावा. मात्र सचिनने इंग्लंडला पाठिंबा देणारे हे ट्विट क्रिकेट नव्हे तर फुटबॉल सामन्यासाठी केले आहे.  

 

फुटबॉल विश्वकरंडकातील इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया यांच्यातील दुसरा उपांत्य सामना आज होणार आहे. इंग्लंडच्या फुटबॉल संघाला पाठिंबा देणारा एक व्हिडिओ सचिनने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला त्याने हातात क्रिकेटचा चेंडू धरुन मी इंग्लंडला पाठिंबा देत आहे असे म्हटले आहे. त्यानंतर काही सेकंद थांबून तो फुटबॉलला जोरदार किक मारत 'फुटबॉलमध्ये' असे म्हटला आहे. 

इंग्लंडच्या संघाने 1990मध्ये शेवटचा विश्वकरंडक जिंकला होता. त्यामुळे कर्णधार हॅरी केन आणि संघाकडून देशवासीयांच्या अपेक्षा नक्कीच उंचावल्या असतील यात काही शंका नाही.


​ ​

संबंधित बातम्या