अर्जुनने लॉर्डसवर चक्क विकले रेडिओ; हरभजनही चकीत 

सुनंदन लेले
Sunday, 12 August 2018

अर्जुन तेंडुलकरला क्रिकेटचे वेड आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. नुकताच तो भारतीय 19 वर्षांखालच्या संघाकडून श्रीलंकेत सामने खेळून आला. सचिन तेंडुलकर कामाकरिता इंग्लंडला आला असताना अर्जुनने लंडनला आल्यावर वेगळी योजना आखली होती. दोन दिवस त्याने भारतीय संघातील फलंदाजांना गोलंदाजी केली.

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्डस कसोटीतील एक दिवस पावसाने वाया गेला तेव्हा तो सचिनसोबत अर्जुन तेंडुलकर सूट-बूट घालून लार्डसच्या खास कक्षात बसला होता. सामना चालू झाला त्या दिवशी त्याने मैदानातील माळ्यांना मदत करताना कव्हर्स उचलली. शनिवारी अर्जुन गळ्यात पट्टा घालून चक्क लॉर्डसचे रेडिओ विकताना दिसला तेव्हा हरभजनसिंगही चकित झाला. 

अर्जुन तेंडुलकरला क्रिकेटचे वेड आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. नुकताच तो भारतीय 19 वर्षांखालच्या संघाकडून श्रीलंकेत सामने खेळून आला. सचिन तेंडुलकर कामाकरिता इंग्लंडला आला असताना अर्जुनने लंडनला आल्यावर वेगळी योजना आखली होती. दोन दिवस त्याने भारतीय संघातील फलंदाजांना गोलंदाजी केली.

"लाज कसली आली स्वयंसेवक बनण्यात...मला सतत मैदानाच्या आवारात राहणे आवडते. मिडलसेक्‍स कौंटीच्या सर्व कनिष्ठ खेळाडूंना स्वयंसेवक म्हणून काम करण्याचे सुचवण्यात आले. म्हणून मी ते काम करतो आहे. शुक्रवारी मला मैदानातील कर्मचाऱ्यांना मदत करायला सांगितले होते आणि शनिवारी रेडिओ विकायला. त्यात कोणताही कमीपणा मला वाटत नाही,' असे अर्जुन भेटला असता म्हणाला.

संबंधित बातम्या