मुलीच्या यशाने सचिनही भारावला

वृत्तसंस्था
Saturday, 8 September 2018

लंडन : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिने आपल्या वडिलांना अभिमान वाटावा, अशी कामगिरी केली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून साराने मेडिसिनची पदवी मिळविली आहे. सचिनने मुलगी सारा हिच्या पदवीप्रदान कार्यक्रमानंतर पत्नी अंजली आणि सारासोबतचे फोटो शेअर केले आहेत. 

सचिनने केलेल्या ट्विटमध्ये त्याने तिचे तोंडभरुन कौतुक केले आहे. ''तु शिक्षणासाठी घर सोडून अगदी कालच गेल्यासारखे वाटत आहे. आता तु पदवीधर झाली आहेस याचा मला आणि अंजलीला खूप अभिमान आहे. तु सारे जग जिंकावे अशीच माझी इच्छा आहे,'' असे ट्विट सचिनने केले आहे.  

Sara Tendulkar

साराने आपले शालेय शिक्षण पूर्ण धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुल या शाळेतून केले होते. त्यानंतर  पुढील पदवी मिळवण्यासाठी सारा लंडनला गेली होती. साराच्या या यशानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

​ ​

संबंधित बातम्या