करोनाविरुद्ध लढण्यासाठी सचिन तेंडुलकरच्या टिप्स

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 March 2020

कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात आणि जगभरात प्रयत्न सुरु आहेत. सध्याची निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सर्वत्र क्षेत्रात चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. देशातील मुंबई, दिल्ली, बंगळुर या सारख्या महत्वाच्या शहरांबरोबरच आता कोरोनाचे संशीयत रुग्ण नगर, पुणे, सातारा, सोलापूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये देखील आढळत आहेत.

शासकीय यंत्रणा या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्नशील राहिले आहे. महाराष्ट्र सरकारही गावा गावांत लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी फलक, रिक्षा तसेच विविध माध्यमातून प्रयत्न करीत आहे. आता या विष्णूावर मात करण्यासाठी देश विदेशातील खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु केले आहेत. 

यामध्ये लॉन टेनिसपूट मारिया शारापोवा, बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही महत्वाचं पाऊल उचललं आहे.
World Health Organization आणि UNISEF च्या माध्यमातून ‪#SafeHandsChallenge या द्वारे सर्वच खेळाडू आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर (फेसबुक, ट्विटर, आदी) त्यांचे व्हिडीओ पोस्ट करीत आहेत. 

हे पहा video  :

सचिने तेंडूलकर यानेही त्याचा व्हिडिओ पोस्ट करुन सध्याच्या परिस्थितीत स्वच्छता राखण्यासाठी आपण स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे असा त्यातून संदेश दिला आहे. 

देशात सध्या करोनोबाधित रुग्ण शंभरपेक्षा जादा आहेत. महाराष्ट्रात एका रुग्ण कोरोनामुळे दगावला आहे. त्यामुळे आगामी काळात शासकीय यंत्रणेबरोबरच कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रयत्न करावे लागणार आहेत.

व्हिडीओ गॅलरी

​ ​

संबंधित बातम्या