सचिनने पहिल्यांदाच असे केले गणपतीचे विसर्जन

वृत्तसंस्था
Sunday, 16 September 2018

सचिन तेंडुलकरच्या घरच्या गणपतीचे तिसऱ्या दिवशी विसर्जन झाले. सचिनने ट्विटद्वारे यंदा घरातच गणपतीचे विसर्जन करत सर्वांनी याच मार्गाने विसर्जन करत पर्यावरणाचे रक्षण करण्याचा सल्ला त्याने दिला आहे. 

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यंदाच्या गणेशोत्सवात घरगुती गणपतीचे घरातच विसर्जन करत इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

सचिन तेंडुलकरच्या घरच्या गणपतीचे तिसऱ्या दिवशी विसर्जन झाले. सचिनने ट्विटद्वारे यंदा घरातच गणपतीचे विसर्जन करत सर्वांनी याच मार्गाने विसर्जन करत पर्यावरणाचे रक्षण करण्याचा सल्ला त्याने दिला आहे. 

सचिन म्हणाला, की नुकतेच मरिन ड्राईव्हवर गाडी चालवत असताना मला दिसले की समुद्रात गेलेली प्रत्येक वस्तू किनाऱ्यावर पुन्हा आली होती आणि दुर्गंधी पसरली होती. त्यावेळी मला वाटले की यंदा मी गणपतीचे विसर्जन घरात करणार. माझ्यासाठी हा मोठा निर्णय होता आणि मी याबाबतच आई व गुरुजींना सांगितले. त्यांना मी पर्यावरण संरक्षणाची माहिती दिली त्यांनीही माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.

​ ​

संबंधित बातम्या