कांबळीच्या ट्विटला सचिनचा भावनिक रिप्लाय

वृत्तसंस्था
Tuesday, 7 August 2018

भारताचा माजी कसोटीपटू विनोद कांबळी याने 'फ्रेंडशिप डे'ला आपला जवळचा मित्र सचिन तेंडुलकर याला शुभेच्छा दिल्या होत्या. बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट 'शोले'तील 'जय-वीरू' यांच्या मैत्रीचे उदाहरण देत त्याने ट्विट केले होते. त्याला सोमवारी तेंडुलकरने ट्विटरवर भावनिक रिप्लाय दिला आहे. 

मुंबई - भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने 'फ्रेंडशिप डे'ला आपला जवळचा मित्र सचिन तेंडुलकर याला शुभेच्छा दिल्या होत्या. बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट 'शोले'तील 'जय-वीरू' यांच्या मैत्रीचे उदाहरण देत त्याने ट्विट केले होते. त्याला सोमवारी तेंडुलकरने ट्विटरवर भावनिक रिप्लाय दिला आहे. 

कांबळीने फ्रेंडशिप डेला केलेल्या ट्विटमध्ये त्याने म्हटले होते, मैदानावर तू महान खेळाडू आहेसच आणि मैदानाबाहेर तू माझ्यासाठी ‘जय’ आहेस. या दिवशी मी इतकेच म्हणेन की ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे...' 

सचिनने सोमवारी त्याला उत्तर देत ट्विट केले, ''शोले हा ऐतिहासिक चित्रपट आहे आणि आपली मैत्री जगावेगळी आहे. माझा विचार केल्याबद्दल आभार मित्रा.''

संबंधित बातम्या