सचिनने घेतली पाच हजार जणांच्या महिनाभराच्या अन्न-धान्याची जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

सचिनने याआधी देखील 50 लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

 कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या देशात गंभीर परिस्थीती निमार्ण झाली असून केंद्र सरकारने "लॉकडाऊन' पुकारले आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संकाटाच्या काळात देशातील उद्योजक व्यापरी, चित्रपट कलाकार खेळाडू अशा  विविध क्षेत्रातील अनेक लोक मदतकार्यात सहभागी होत आहेत. त्याच्यासोबतच क्रीडापटू देखील या लढ्यात मागे राहिलेले नाहीत. मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरने कोरोना 5 हजार लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.  

लॉकडाउन काळात महेंद्रसिंह धोनी करतोय हे काम, साक्षीने शेअर केला फोटो

देशाच्या सर्व स्तरातून मदत केली जात आहे, भारतीय क्रिकेट संघातील कर्णधार विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी इत्यादी खेळाडूंनी अर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. तर काही खेळाडूंनी गरजू लोकांना तांदूळ बटाटे असे अन्नधान्य देखील दान केले आहे.

अजिंक्य रहाणेची छोटीशी मुलगी सांगतेय घराबाहेर पडायचं नाही.. पहा व्हिडीओ.. 

सचिनने याआधी देखील 50 लाख रुपयांची आर्थिक मदत कोरोना विरोधात देशभरात चालू असलेल्या लढ्यासाठी केली होती. आता त्यांने मुंबई येथील गरजू लोकांसाठी काम करणाऱ्या आपनालय या संस्थेच्या मदतीने लोकांना अन्नधान्य पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सचिनकडून या संस्थेच्या मदतीने 5000 गरजू लोकांना महिनाभर लागणारे अन्नधान्य तसेच गरजेचे राशन साहित्य पुरवण्यात येणार आहे. अपनायन या संस्थेकडून ट्विट करत यासंबंधीची माहिती देण्यात आली.   

 

 

सचिनने अपनालय या संस्थेला चांगले काम करत चांगले राहण्याचा, तसेच गरजू लोकांना मदत करत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या..

 

 

 


​ ​

संबंधित बातम्या